शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
गझल लेखन स्पर्धेकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन.
साहित्य सागर साहित्य संघ मेहकर यांच्या वतिने गझल सम्राट
सुरेश भट यांच्या जयंती निमित्त गझल लेखन स्पर्धेचे आयोजन
करण्यात येत आहे. तरी या गझल लेखन स्पर्धेसाठी साहित्य
पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गझल पाठवितांना गझलेच्या खाली गझलेच्या वृत्ताचा स्पष्ट
उल्लेख करून दोन गझल, अल्पपरिचय, पासपोर्ट फोटो, दोन
पोस्ट कार्ड, पाच रू. दोन पोस्टाचे तिकीट ०१ मार्च पर्यंत
स्पिडपोस्ट किंवा कुरिअरने पाठवावे असे आवाहन साहित्य
सागर साहित्य संघाचे कार्याध्यक्ष योगेश टेकाळे, सुबोध मराठी
शाळेजवळ, इंदिरा नगर, मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा
यांनी केले आहे.
प्राप्त गझले मधुन सर्वोत्कृष्ट तिन गझलकारांना स्मृतिचिन्ह,
व सन्मानपञ देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच सर्व
सहभागींना सन्मानपञ देवून गौरविण्यात येईल. तरी जास्तीत
जास्त गझलकारांनी या स्पर्धे करिता प्रवेशिका पाठविण्याचे
आवाहन करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
namaskar kavi mandali
उत्तर द्याहटवा