साहित्यिक मिञहो,
सस्नेह नमस्कार,
साहित्य सागर साहित्य संघ, महाराष्ट्रतील एक अग्रगण्य साहित्यिक चळवळ असुन, सांस्कृतिक, साहित्यिक, क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवून, साहित्य सागरने नावलौकिक सार्थ केले आहे. या संस्थेची तेजस्वी पाऊले उमटवून ‘साहित्य संघ’ आता आठव्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. मराठी भाषा आणि नवोदित साहित्यिकांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने साहित्य सागर साहित्य संघाचा जन्म झाला. मिञहो, आजच्या या स्पर्धेच्या युगात नवोदित साहित्यिक म्हणजे धुळीत पडलेलं सोन आहे , ज्यांच्याकडे कुणीही सकारात्मक विचाराने बघायला तयार नाही. आणि याच उदासिनतेमुळे बरेचसे कसदार लेखन करणारे नवोदित स्थानिक वृत्तपञे किवा मग एखादा कथा किवा काव्य संग्रह काढुन आपला साहित्य प्रवास संपवितांना आम्ही पाहिले आहेत. ही परिस्थिती बदलवण्यासाठी काही समविचारी नवोदितांनी एकञ येवुन २८ फेब्रुवारी २००६ रोजी मराठी भाषा आणि नवोदित साहित्यिकांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने साहित्य सागर साहित्य संघाची स्थापना केली. संघाचे मुख्यालय मेहकर, जि. बुलडाणा (महाराष्ट्र) येथे असुन महाराष्ट्रात सध्या संघाच्या १५ शाखा कार्यरत आहेत. संघाच्या वतिने नवोदित कवी, लेखकांना प्रोत्साहण देण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात येतात.
०१} काव्य लेखन स्पर्धा
०२} कथा लेखन स्पर्धा
०३} प्रातिनिधीक काव्य संग्रहाचे प्रकाशन
०४} वार्षिँकांचे प्रकाशन
०५} ई पुस्तकांचे प्रकाशन तसेच इतर साहित्यिक उपक्रम संघाच्या कार्यरत शाखांच्या वतिने राबविण्यात येतात. लवकरच साहित्य सागर साहित्य संघाचे मुखपञ म्हणुन 'साहित्यदिप' नावाचे मासिक सुरु करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. तरी नवोदित कवी, लेखकांना विनंती आहे की त्यांनी साहित्य सागर साहित्य संघामध्ये सहभागी होवुन ही चळवळ मजबुत करण्यास सहकार्य करावे. संघाच्या संपुर्ण महाराष्ट्रात शाखा स्थापण करण्याची आमची जोरदार तयारी सुरु आहे, तरी आमच्या कार्याला हातभार व साहित्य सेवेचे करु इच्छीत असलेल्या साहित्यिकांनी अवश्य कळवावे. तसेच आपल्या मोलाच्या सुचना, प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा